श्राप – पाप

काय घडले असे पाप ?
कुणी दिला हा श्राप ?
कुणाचे केले वाकडे ?
अभिशापासाठी घालेन साकडे.

पण असा कोणीच नाही दिसत,
सारेच असतात माझ्याशी हसत,
कसे ओळखू कोणाला आला रुसवा,
माझ्याप्रमाणे कुणाचा चहरा असेल फसवा.

तुला शोधण्यात खूप वेळ जातो,
पण थोडा वेळ या प्रश्नांना ही देतो,
एवढे शोधून तू नाहीस भेटली,
म्हणून पश्चातापाची युक्ती सुचली.