स्वप्ने

मोडू दे भले स्वप्ने मोडली,
मानेन ती मोडण्यासाठी होती घडली,
पण अशी तू हट्टावर नको अडू,
शेवटचं भेटल्याशिवाय मला नको सोडू.

मोठ्या हौसेने होती स्वप्ने रंगवली,
त्यांच्यासाठी रात्र रात्र जागवली,
दोघांचा होता यात समान वाटा,
यापेक्षा नव्हता कोणता ध्येय मोठा.

पण आपल्या हाती नसतात सार्‍या गोष्टी,
स्वप्नांना लागलीच वक्र दृष्टी,
जेवढ्या मेहनतीने ती होती रंगली,
तितक्याच क्रूरतेने ती भंगली.

म्हणूनच होऊन निराश गेलीस दूर,
लपवलास सारा अश्रूंचा पूर,
पुन्हा भेटलीसच नाहीस त्या नंतर,
आज माहीतच नाही किती पडलयं अंतर.

माझ्यासाठी हि होता हा जबर धक्का,
स्वप्नांचा जग पडलेला फिक्का,
पण तुझ्यासारखा दूर नाही गेलो,
उलट तुला पुन्हा शोधायला लागलो.

आज तुला एकदा तरी भेटण्याचे स्वप्न बघतोय,
खरं तर त्या स्वप्नासाठीच जगतोय,
हट्ट सोडून हे तरी स्वप्न कर पुरे,
भेटल्यावर ठरव तुला जे वाटेल बरे.