हट्ट

आता सारे हट्ट सोडले,
नतमस्तक होऊन हात जोडले,
शेवटचे हट्ट तू एकदा भेटाय यावे,
मग हवे ते करावे नवे.

चिरडले दैवाने प्रितीचे रोप,
तिथपासून उडाले माझी झोप,
तुझा शोध हे एकच ठेवले ध्येय,
घेऊ ना दिले दैवाला दुरावण्याचे श्रेय.

येत्या अपयशाने काळीज दुखतो,
तरी भेटीच्या नव्या योजना आखतो,
चाहूल लागते तिथे आवाज देतो,
शोधूशोधून मेटाकुटीस येतो.

पण सततच्या अपयशाने मन खचले,
वाटते आपल्यात दम नाही वाचले,
म्हणूनच तुझ्यासमोर जोडले हात,
एकदा येउन विरहाला नाहीतर मला दे मात.