अज्ञातवास

आज हि तुझी वाट बघत आहे बसलो,
नाही भेटलीस म्हणून स्वतःवर आहे रुसलो,
थोडे वेगळे आहे रुसव्याचे कारण,
कळत असून हि काहीचे होते विस्मरण.

भले तुझ्यात खोलवर मन होता गुंतला,
जीव ओतला तुझा शोध घेतला,
पण वर्षे लोटली हात रिकामेच राहिले,
माहित हि नाही झुंजताना आहेस का पाहिले ?

मुलीची तुझी जात,
पोळले असतील आई-बाबांचे हात,
त्यांनी नक्की केले असतील पिवळे,
केवळ माझ्यासाठीच जे होते कोवळे.

पण जर हे असेल खरे,
संस्कार नाही माझ्यावर तोडण्याची घरे,
तुझ्या नव्या नात्याला नक्की देईन आदर,
पण एकदा उचल अज्ञातवासावरील चादर.