अन्न लागेना गोड

अन्न लागेना गोड,
द्रव्याची उरली ना ओढ,
आयुष्य बनत चालले निरस,
एक तूच बनू शकतेस पारस.

नियती अद्याप ही लाथ मारी,
गंज चढत चाललाय भारी,
उपाय न केल्याने बनतोय क्षीण,
माझ्यासारखा दिसणारच नाही हीण.

हे थांबवण तुझ्याच आहे हाती,
बरं होईल घेतलीस जर गती,
पारसापरी येउन मझे सोणे कर,
बघ कसे उजळेल आपले घर.

लवकर ये मी बघतोय वाट,
अतुर आहे जुळवाया आपली गाठ,
सांग कुठे येऊ तुला आणायला,
फार आहे अतुर तुझा बनायला