अश्रू त्याग

भले विरहाने किती पिडले,
पण डोळे सुरुवातीलाच रडले,
मग कायमच अश्रू सोडले,
याचे तुज विपरीत दर्शन नाही ना घडले.

त्वरित सांत्वन मिळवते रडणे,
पण दैवाचे थांबलेच ना नडणे,
प्रारंभ तर आपण हि असाच होता केला,
पण आत्ताची ना कमी झाली बला.

गीतेत सांगितले महत्वाचे कर्म,
विरहाबाबतीत हि घेतले तेच वर्म,
मग अश्रुना दिला विराम,
अराम माझा केला हराम.

तिथपासून गिरवतोय तुझ्या शोधाचा धडा,
आणि सहन करतोय सारी पीडा,
कोरड्या डोळ्यांचा चुकीचा लावू नको अर्थ,
जमल्यास माझा अश्रू त्याग कर सार्थ.