आठवण बांधले पाठीला

आठवण बांधले तुझी पाठीला,
अर्थ नव्हे धरावे तू मला वेठीला,
एवढे सतावणे बरे नव्हे,
नको विसरू जीवन केले तुझ्या नावे.

दैवास घाबरून गेलीस निघून,
एकदाही पाहिलेस ना मदत मागून,
मिळून शिकवला असता सार्‍यानां धडा,
एक तुझाच तर होतो मी वेडा.

दिलेले विरह पडले ना पचनी,
एक तूच राहिलीस माझ्या वचनी,
त्या वचनांची करायची होती पूर्ती,
म्हणून शोध मोहिमेत झालो भरती.

तिथपासून तुझी आठवण पाठीला बांधली,
असुदे भले हि प्रीत असेल आंधळी,
नाही माहित तुला हे किती आहे कळत,
पण शोध कर्तव्यापासून मी नाही पळत.