आस

कोणी म्हणे आजार कोणी म्हणे रोग,
टोमण्यांचा कमी ना होई ओघ,
सारे निमुटपणे घेतो ऐकून,
थोडे ठेवतो बाकी देतो फेकून.

दिवस आहेत घ्यायचे ऐकून,
कोणाला सांगणार जरी गेलो थकून,
तू होतीस ती गेलीस दूर,
विशेष काय जरी सारेच झाले क्रूर.

माझे म्हणने कुणालाच नाही पटले,
रडणे ऐकून तुलाही परतावेसे नाही वाटले,
गुदमरतोय श्वास मारून हाका,
नियतीला आणखी देऊ नको मौका.

तुझ्या परतीची सोडली नाही आस,
म्हणूनच त्या टोमण्यांचा घेत नाही ध्यास,
तू आल्यावर नक्की बदलेल सारे,
मग लोकांचे नाही आपले वाढतील तोरे.