उपकार कर

देवाला केले रुष्ट,
धर्म करतोय भ्रष्ट,
अहो रात्र तुझाच करतोय जाप,
सांग आणखी कोणते करू पाप.

तू गेल्यावर तुझे महत्व पटले,
तुझ्या शिकवणुकीचे रान उठले,
पुढे ही तू सांगशील ते करेन,
जवळचे सारे तुझ्यावर हरेन.

आता एकच आहे सांगणे,
तुझ्याशिवाय व्यर्थ हे जगणे,
पण ते ही करेन जर सांगशील तर,
मात्र एकदाच भेटण्याचे उपकार कर.

न सांगता तू अवचित गेलेस,
सारे संभाळले जे होते दिलेस,
जड जाईल ते परत द्यायला,
तरी एकदा ये त्यांचा निर्णय घ्यायला.