गीत

मानतेस मला देव,
अशीच मनात मला ठेव,
प्रेमात पडू देऊ नको कमी,
माझ्याकडून तशी देतो हमी.

चूक – भूल थोड्या फार होणार,
पण तुझ्याशिवाय कोण मला समजून घेणार,
म्हणून कधीतरी येणारच तुला रुसवा,
पण कधी वाहू नको देऊ आसवा.

आपले नाते थोडे आहे वेगळे,
असेच म्हणायचे ना सगळे,
त्यानाही ते खरे करून दाखऊ,
वैवाहिक प्रेमाची नवी व्याख्या शिकऊ.

अडचणी आहेत देऊ त्यांना मात,
सार्‍याना दाखऊ आपली औकात,
आपलीच होईल अंतिम जीत,
त्या वेळीही गाऊ असे गीत.