गोडवा

सांग तुझी कशी समजूत काढू,
बर्फी कि लाडू समोर वाढू,
तुझ्याशिवाय त्यांना स्पर्षही आहे पाप,
प्लीज, धुवून काढशील का हा श्राप ?

स्वीटहार्ट ची दिलेलीस उपाधी,
पण तुझ्यानंतर कडवटपणाच आला पदी,
एवढ्या कडवटपणाने स्वतः झालोय कडू,
सांग हा दुष्टचक्र कसा मोडू.

पुन्हा हवाय मला गेलेला गोडवा,
त्यासाठीच देतोय लढा कडवा,
सांग त्यासाठी आणखी काय सोडू,
भले त्यासाठी होईन आणखी कडू.

पण माझी सारी प्रयत्ने झालीत बेचव,
आता तूच मला वाचव,
पुरेसा ठरेल भरवलेला साखरेचा कण,
आयुष्यभर जपेन तो अनमोल क्षण.