तुला प्रसन्न करू कसे ?

तुझ्यासाठीच रडून डोळे होते सुजले,
तुझ्याशिवाय त्यांनी काहीच ना पूजले,
तरी हि तू झाली नाहीस प्रसन्न,
ह्रिदय होतच राहिले छन्न विछन्न.

तुझ्यानंतर ओळखली माझी सीमा,
घडल्या चुकांची मागितलीही क्षमा,
माहित ना तुझवर ती पोहचली कि नाही,
वाटते कधीतरी करशील माफिनाम्यावर सही.

मान्यही होती मला सजा,
तुझ्या आयुष्यातून व्हायचे नव्हते वजा,
पण सजा मिळाली भलती,
चुकांच्या प्रमाणाचे मेल ना मिळती.

आता तूच सांग तुला प्रसन्न करू कसे ?
समोर कोणताच मार्ग ना दिसे,
देतो वचन मागणार ना वर दान,
एकदा स्वतःला नजरे समोर आण.