तोटा

दगडालाही फुटला असता पाझर,
पण पाझरेना तुमची नजर,
देव आणि तू एका माळेचे मणी,
नाही तुम्हासारखा आणखी कोणी.

मला आपलेसे तुम्ही केले,
न मागता एवढे सारे दिले,
सगळ्यात जवळचे वाटले आपले नाते,
प्रेम आणि भक्ती ने भरलेले खाते.

पण सारे चालले असताना गोडीत,
आपले खाते निघाले बुडीत,
ना व्याज ना मिळाली मुद्दल,
चांगलीच घडवलीत मला अद्दल.

कसा सहन करू हा तोटा,
म्हणूनच चाललाय हा आटा पिटा,
सांग तुम्हापैकी कोण आधी भेटेल,
अन हा बुडीतपण कायमचा मिटेल.