दंड

दैव झाले रुष्ट,
लागली प्रितीला दृष्ट,
लोटले आपणास या विरहाच्या जगी,
म्हणूनच दिवस आले हे भोगी.

कोणाचे कधी ना बिघडवले,
ना कधी कुणास रडवले,
कुणाच्या नजरेत प्रित खुपली ?
दैवाची नजर का आपल्यावर कोपली ?

तरीही मागितली क्षमा,
ईश्वर चरणी झालो जमा,
क्षमा नसल्यास अंतिम द्यावा दंड,
ते तरी करेल सारे थंड.