दगाबाज अंबर

दगाबाज निघाला अंबर,
विनवण्या केल्या शंभर,
तुला शोधण्याची दिली सुपारी,
बाहेर पडलीसच असशील सकाळी वा दुपारी.

नुसताच करत राहिला का शोधाचा गजर ?
तुजवर कधीच ना पोहोचली का नजर ?
वाकुल्या दाखवण्याचे सुख दैव आहेच भोगत,
वाटले कुठे तरी तुला अंबर असेल बघत.

तू हि अहो रात्र बसली नसशील घरात,
माझा कानोसा घेण्या आली असशीलच दारात,
कधी बाहेर हि असशील पडली,
कशी नसेल त्याच्याशी भेट घडली.

हळू हळू येते सारे ध्यानी,
नको फुंकाय कोणी माझ्या कानी,
तो हि तुझ्या प्रेमात असेल फसला,
उगाच का सारे सोडून दगा फटकाच दिसला.