दिवा स्वप्न

आज ही तू परत नाहीस आली ,
माझी मान पुन्हा गेली खाली ,
यात तसे काहीच नाही नवीन ,
यातच तर आता झालोय प्रवीण .

थोड्या वेळाने जाईन घरी ,
घेऊन मन झालेले भारी ,
हात पाय ही होतीलच जड ,
पण घराशिवाय नाही पर्यायी गढ .

चांगले नाहीत तसे घराचे हाल ,
मायेपोटीच ते वाटते महाल ,
पण महाल सुख पडेना पचनी ,
तूच वचनी आणि तूच लोचनी .

उद्या पुन्हा येईन पहाण्या तुझी वाट ,
तू न येण्याचीच शक्यता असेल दाट ,
पण मनाला समजावणे नाही माझ्या हाती ,
ते तर आज ही दिवा स्वप्न पहाती .