धाक

शरमेने मान झुकते,
कळे ना माझे कुठे चुकते,
पोहोचली कि नाही तुझवर माझी हाक,
कुठे गेला तो माझा धाक.

एका हाकेने व्हायचीस पाणी पाणी,
एवढा धाक ना कमावला कोणी,
कधी गेली नाहीस माझ्या विरुध्द,
आखलेल्या योजना व्हायच्या रद्द.

एकदाच विरुद्ध गेलीस,
पण कायमची परकी झालीस,
विरोध हि तसा होता छुपा,
घाबरून निवडलास मार्ग दुरावण्याचा सोपा.

तिथपासून तुझी समजूत आहे काढत,
कधी कधी पाराही आहे चढत,
माहित ना तुला हे कळते कि नाही कळत,
पण धाक हरवल्याने मन आहे जळत.