नजर हि सांगेल

गरजेचे नाही हलवणे ओठ,
नाही गरजेचे दाखवणे बोट,
तुझ्या भोवती असेल नात्यांचा पसारा,
म्हणून गरजेचा हि नाही इशारा.

दुरावून आपणास लोटले एक युग,
दरम्यान घडले असतील नात्यांचे संयुग,
पण हा अंदाज आहे फक्त,
केला नाहीस निरोपाने मुक्त.

इतकी वर्षे दुरावा आहे सोसत,
तरी तू कुठेच नाहीस दिसत,
म्हणून मानला हा अंधार काळा कुट्ट,
त्याच हिसाबाने केलाय मन घट्ट.

तुझ्यावर काही यायला नको संकट,
म्हणून नको करू सारेच प्रकट,
दाखवल्यास नजर हि सांगेल बरेच काही,
सांगितलेले ऐकेन सारे याची देतो ग्वाही.