नवी पहाट

अंधारमय झाले माझे जग,
निराषेचे पसरलेत त्यावर ढग,
तूच आणू शकशील पहाट नवी,
तुझ्यावरच अडल्यात योजना भावी.

करायचे होते एक आणि झाले एक,
दैवाने आखली आपल्यात मोठी रेख,
आजही झटतोय ती करायला पार,
थांबलो नाही भले पहात राहिलो हार.

सांग कुठे मिळतील आशेचे किरण,
जगण्यास पुरेसे ठरतील ते तारण,
नवी पहाट नाही तर दे नवी रात्र,
एका इशार्‍यावर खोलम्बलेत माझे नेत्र.