नाटक

<div class=”scroll-content”>
का करतेस विसरण्याचे नाटक,
उगाच केली नव्हतीस प्रेमात अटक,
तुझी आहे मला चांगली ओळख,
नाही भ्रमणार मला आत्ताचा काळोख.

कधीच नजर नव्हती तुझी भटकली,
दिन – रात्र माझ्यात असायची अटकली,
तुझ्या हट्टाने भले आज दुरावली,
पण बघ माझ्यातच असेल हरवली.

मनाला माझीच असायची तहान,
माझ्यासाठी टाकलेले सारे गहाण,
माझ्याशिवाय कशी ती तहान भागेल,
निट बघ तो आजही मलाच मागेल.

नको अशी स्वतःला मारू,
मारून नको आदर्श ठरू,
एकदा अखेरची दे साद,
आपल्या आदर्शाला जग देईल दाद.
</div>