ना कुणाचे ऐकले

कधी ना कुणाचे ऐकले,
मनी आले ते केले,
तुला पुन्हा भेटाया वाट्टेल ते,
सारे करून झाले,  उरलीत हि गीते .

लोक म्हणतात केलास मला परका,
पण त्यात विश्वासू भेटला ना तुझ्यासारखा,
सार्‍यांचे ऐकले केले मनातले,
शीतल मानले दिवस उन्हातले .

मन तुझ्याच प्रीतीने ठेवल उष्ट,
कधीतरी भेटशील सोडला नाही हट्ट,
हट्टासाठी सोडले नाही प्रयत्न,
तू असल्याचा भास हि जाणवतो रत्न .

तुझी संभाव्य ठिकाणे नाही सोडली,
मला अनोळखी जगांशी नाती जोडली,
ओळखी अनोळखींकडे केली चौकशी,
आता करणे उरले  केवळ वाराणसी-काशी .