नियतीचे बंध

कसा सोडलास माझा छंद ?
कसा विसरलीस माझा गंध ?
माझ्याशिवाय घेत ही नव्हतीस श्वास,
कसा ठेवलास नियतीवर विश्वास.

तिचा तो होता घाट,
उधळायचा होता प्रीतीचा थाट,
निष्पाप प्रेम डोळ्यात होते सळत,
रडणारे मन तिला नव्हते कळत.

पण तिच्या घाटाला मिळू ना दिली किंमत,
तुझ्या ओढीने वाढवतच राहिलो हिम्मत,
भले नंतर जुळू ना दिली आपली तार,
पण हिमतीमुळे तिलाही दिसत असेल हार.

हीच हिम्मत तू ही बाळग थोडी,
नक्की बदलू ही विरहाची घडी,
एकदा ओळख विरहाने दुखावलेला गंध,
आपोआप तुटतील लादलेले नियतीचे बंध.