निर्णय

मनात हवं ते साठवं,
पण एकदा मला आठवं,
बघ डोळ्यात येतो का पाणी ?
बघ मी वाटतो का कोणी ?

कधी माझ्यात तुझे होते सारे,
माझ्याशिवाय जगणे होते कोरे,
पण आज कोरा मला करून गेलीस,
का हि कायमची भेट दिलीस ?

भेट नव्हती तुझी साधी,
तिने दुरावली मऊ गादी,
रात्र रात्र काढतो जागून,
भले काही मिळत नाही असे वागून.

आवडते हेच जगणे तरी,
पहायचे आहे परतलेली तू घरी,
समर्थ तू निर्णय घेण्यात,
पण तूच असशील माझ्या प्रत्तेक गाण्यात.