निर्णय

केवळ एकदाच दे संधी,
एकदा उठव स्वतःवरील बंधी,
नंतर काहीच नाही मागणार,
बोलशील तर पुढे नाहीच जगणार.

तुझ्यानंतर जगणे झाले व्यर्थ,
तुझ्याशिवाय उरले ना काही स्वार्थ,
लक्ष, ध्येय, स्वप्न, तूच सारे काही,
प्रसाद हि तुझ्याशिवाय नुसतीच लाही.

म्हणूनच दुरावलो नाही मनाने,
शिवाय सुधारलो गुणाने,
तुझी शिकवण नंतर कळली,
तू परताया ती काटेकोर पाळली.

परीक्षा घेऊ शकतेस दुरून,
तुझ्याच नावाने गेलोय भरून,
जीवन मरण तूच ठरव,
एकदा तुझी झलक आणि निर्णय पुरव.