पुन्हा

दाखवत नाही माझा धाक,
विनंतीच करतोय एक पाऊल टाक,
माझी शंभर पाऊले निष्क्रिय ठरली,
म्हणून पुन्हा तुला हाक आहे मारली.

सगळीकडे शोधून झाले,
डोळेही करून झाले ओले,
धावपळीने अंग सुजले,
सार्‍या स्वास्थ्याचे बारा वाजले.

जवळच्यांची मदत मागितली,
देवाला हकीकत पुन्हा सांगितली,
पण जवळ होते ते झाले परके,
देवाचरणीही वाटू लागले पोरके.

हा संघर्ष चालू इतके वर्ष,
पण थोडाही यशाचा नाही स्पर्श,
फुकट गेला माझा प्रत्येक पाऊल,
तुला तरी बघ मिळते का यशाची चाहूल ?