भयाण रान

ना दिसतो झाड ना पाला ,
तरी भयाण रान भासते मला ,
भयाण रानी एकटा आहे फसलो ,
तुलाच शोधतोय समजू नको रुसलो .

या रानी वाटा अनेक ,
पण हवी तुझ्याकडे नेणारी एक ,
अनेक वाटांवर थकलो चालून ,
पण नेमकी वाट येई ना कळून .

रानी आहेत इथे हिंस्र प्राणी ,
कळत ना त्यांस प्रेम फुललेले मनी ,
त्यांनीही कधीतरी घेतली असतेच चव ,
पण वयाने धूसर झाली असते आठव .

पोट भरतोय मन खाऊन ,
तहान भागवतोय अश्रू पिऊन ,
तसे या रानी खायला बरेच मिळते ,
पण तब्बेत बिघडेल हे ही कळते .

बरेचदा होते ही इथे भुताटकी ,
दिसतेस समोर मला एकटी ,
गायब होतेस लावता हात ,
रडणेही कधी येते अंगात .

आवडते का माझे असे फसणे ,
कसे आवडते माझ्यापासून दूर असणे ,
केवळ एकदाच भेट मला या रानी ,
मग ऐकेन जे असेल तुझ्या मनी .