माती

तुझ्या प्रीतीने झालोय धन्य,
जवळ नसलीस तरी नको काही अन्य,
बर होईल शेवटचे एकदा केलेस धन्य,
तूच शांत करशील धगधगते अरण्य.

त्यास धगधगते मीच ठेवले,
होऊ ना दिले त्याचे सोवळे,
दिवस रात्र पुरवत गेलो इंधन,
विसरता नाही आले आपले बंधन.

सांगत नाही पाणी शिम्पड थंड,
विझवाया फेक माती प्रचंड,
प्रयत्न कर जादू आहे तुझ्या हाती,
शांत वा अंत करेल अश्रूंनी भिजलेली माती.