वाट

दिवस, महिने, वर्षे गेली,
करायची ती सारी प्रयत्ने केली,
पण तू ना कधी आलीस परत,
मी मात्र बसलो प्रतीक्षा करत.

एकटा सुखी नव्हतो पण दुःखेही नव्हती,
घर, मित्र होते अवती भोवती,
पण प्रीतीची तहान सारखी होती लागत,
त्यासाठीच तुझ्याशी जोडली संगत.

मनसोक्त मिळाली तुझी प्रीत,
पुरी करायचीच होती समाजाची रीत,
सात जन्मांसाठी तुझ्यावर हक्क होता हवा,
तोच हक्क भले जन्म मिळाला नवा.

पण खेळ अर्धवट ठेऊन फिरवलीस पाठ,
मी माठ पहातच बसलो तुझी वाट,
या प्रतीक्षेत आज वर्षे लोटली,
पण वाट बघण्याची सवय नाही मिटली