शेवटचा वसंत

कधीतरी तू परत येशील,
कधीतरी तू माझी होशील,
हा एकच ठेवलाय ध्यास,
दुसरी ना कोणी उरली आस.

बरच काही मी आहे गमावले,
पण हवे होते ते नाही कमावले,
जमि-कमी चा हिसाब कधी नाही मांडत,
कारण आजही बरेचसे आहे सांडत.

असे करताना मीच उरलो केवळ,
उतरली जवळची सारी हिरवळ,
आज ना धन ना उरले सत्ता,
सापडायला हि अवघड राहता पत्ता.

तरीही तुझी आस ठेवले बाकी,
म्हणून तुझेच नाव आहे मुखी,
जास्त नाही क्षणभर काढ उसंत,
हवे तर तोच असेल माझा शेवटचा वसंत.