अंधारी भुयार

एक सुंदर स्वप्न पाहिले,
स्वप्न ते स्वप्नच राहिले,
प्रयत्ने केली भले किती,
पण सार्‍या सार्‍याची झाली माती.

स्वप्नात नव्हते धन,
नव्हता सत्तेचा कण,
ना कुणाशी स्पर्धा होती,
काही गमावण्याची नव्हती भीती.

तूच होतीस मनाच्या जवळ,
तूच होतीस स्वप्नात केवळ,
एकच ध्येय होते तुझी साथ,
तुझ्या सोबत जगायचे होते गाणे गात.

पण सारे उलटेच घडले,
विरहच नशिबी पडले,
त्यास मिटवण्याचा ही स्वप्न तयार,
पण त्यासाठी आज ही भटकतोय अंधारी भुयार.