आपली भेट

रोज स्वप्नी येऊनी,
प्रीत ठेवलीस जपुनी,
अशीच समोर ये कधी,
चालेल आलेली क्षणभर साधी.

स्वप्नी येत नाहीस नुसतीच काही,
तुलाही विरह आवडत नाही,
पण सतावण्याची गेली नाही सवय,
तेच सारे मला पुन्हा हवय.

त्यासाठी मी झगडलोय फार,
सतत खात आलोय मार,
तन मन भले झाले जखमी,
तरी आजही घेतोय जोखिमी.

तुला वाटतं तसं तू वाग,
पण मी जळतच ठेवीन ही आग,
आहे विश्वास कधीतरी तुला हे कळेल,
नाही स्वप्नी, सत्यात आपली भेट जुळेल.