आस

कळते मनापासून मला नाही सोडलेस,
स्वप्नी येतेस, नाते ही नाही तोडलेस,
मग का बसलेस अशी लपून,
किती ठेवशील विरह जपून.

मला सहन झाला ना दुरावा,
याचा द्यायला नको पुरावा,
क्षणभर ही करमत नव्हते दूर,
का वाहू नये आज अश्रूंचा पूर.

म्हणायचीस वेगळेच नाते आपले,
दोघांनी त्यास फुलासारखे जपले,
कसे कोमेजून देऊ हे फुल,
एवढीशी ही होऊ देत नाही भूल.

म्हणून सार्‍याचाच करतोय सांभाळ,
घेतोय शिरावर कोसळलेले आभाळ,
भले आज नियती असेल कोपली,
आस आहे, कधीतरी भेट होईल आपली.