उशिर

उशिरा मिळाली खबर,
खबरीने धक्का दिला जबर,
काना – डोळ्यांवर विश्वास नाही बसला,
अचानक कसा हा विरहाचा साप डसला.

तुला खबर होती आधी,
पण तू फसलीस अश्रूंच्या नादी,
थोडीशी भनक ही मिळू ना दिलीस,
वादळ समजून वार्‍याला शरण गेलीस.

माझ्यातली हुल्लडबाजीच तुला दिसली,
माझ्यात हिम्मत ही तेवढीच होती ठासली,
पाहण्यात थोडीशी केलीस चूक,
आणि दोघांसाठी ओढाऊन घेतलेस दुख.

ते दुःख एवढे दिवस भोगले,
त्या सोबत आणखी बरेच दुःख जगले,
झेलत गेलो सार्‍या दुःखांचा भार,
पण कधी मानली नाही नियती समोर हार.

काल तुला शोधत होतो,
आजही तुझ्या शोधाचा ध्यास घेतो,
तन मनात आजही तुझीच आहे मूर्ती,
देवाची कमी तुझीच जास्त करतो आरती.

या आरतीला कधी देशील जाग,
कधी विझवशील तन मनातील आग,
होरपळण्याआधी एकदा नजरेस पड,
आत्मशांती साठी किमान दोन अश्रू रड.