ऊब

असे कसे विपरीत घडले,
विरहाशी नाते जडले,
गोष्ट ना तुला ना मला कळली,
कळल्यावर मने जळली.

शोधतोय काय घडला गुन्हा,
कसे ओढावले विरहाच्या उन्हा,
उन्हाने होरपळून निघालो पार,
कुठेच सापडेना सावली गार.

सार्‍यांच्या पडलो पाया,
मागितली थोडी दया,
पण सार्‍यांचेच काळीज होते दगड,
कशाचीच घालता आली ना सांगड.

चालू आहे आज एकट्याची लढाई,
भले उरली ना पूर्वीची बढाई,
प्रीतीची ज्योत ठेवले जळत,
जगण्यापुरती आहे उब मिळत.