कट्टी

एवढी होती आपल्यात गट्ठि,
कशी घेतलीस माझ्याशी कट्टी,
बरे तिच्यातून तरी कधी घेशील सुट्टी,
नको होऊस एवढी हट्टी.

तुझ्या कट्टीने सारे बदलले,
दैवाने समोर विरह आदळले,
प्रयत्ने केली त्यास करण्याला पार,
पण वर्षानु-वर्षे मिळतच राहिली हार.

तरी मी तसाच राहिलो हट्टी,
सोसत राहिलो दैवाची तप्त भट्टी,
वाटले तुला ना पहावणार माझे हाल,
कधीतरी मिळवशील माझ्या सुरात ताल.

माहित नाही तुला हे कळले किती,
पण कळताच उशीर करू नको अति,
क्षणभर तरी घे माझ्याशी बट्टी,
सावर नाहीतर संपव ही जिंदगी उष्टी.