कुठे अडतंय

विसरलीस काय तू प्रेमाची भाषा,
कोणत्या भाषेत सांगू माझी दशा,
एवढी हुंदके गेली वाया,
पुन्हा मिळालीच ना तुझी छाया.

विरहाने होरपळले पार,
झोंबतोय वारा थंड गार,
तरी शोधासाठी झालो जहाल,
आणि त्याच्यावरच केले सारे बहाल.

तुला खूप हाका मारल्या,
मारलेल्या फेर्‍या ही फोल ठरल्या,
कळत नाही नक्की काय घडतंय,
हाक पोहोचण्यावर कि भाषेवर अडतंय.