कुठे बसलेस दडून

कुठे बसलेस दडून,
का आहेस अशी अडून,
तुला नाही का होत त्रास,
तुझा नाही का अडकत घास.

तुझ्यावर प्रेम करेन आजीव,
कारण तू ही तेवढाच लावलास जीव,
काळजी घेतलीस समजून बाळं लहान,
सर्वस्व ठेवलस माझ्यासाठी गहान.

आलेले संकट एकटीने पेळले,
मला त्यातील थोडे ही ना कळले,
कळले तेंव्हा झालेला फार वेळ,
प्रितीचा विरहाशि झालेला मेळ.

तिथपासून पश्चातापाने जळतोय,
पळतोय जिकडे तुझा ठाव कळतोय,
पण आजवर कधी तू नाहीस भेटली,
रागवून दडून बसलेस हीच गोष्ट पटली.