कोणता देश

कसे समजाऊ तुला आता ?
केवळ आपटायचा राहिला माथा,
एवढे समजाऊन ही तुला नाही कळत,
कि माझा संदेश तुला नाही मिळत ?

दैवाने उध्वस्त केली प्रेमाची बाग,
खूप झोंबली विरहाने लावलेली आग,
थोडा ही मिळाला नाही गारवा,
ना मिळाला मायेचा गोडवा.

केवळ तुलाच हे हाल समजून येतील,
कारण तूच पाहिलास माणूस आतील,
म्हणूनच तुझीच मागतोय साद,
त्यासाठीच चालू विरहाशि वाद.

वाद जिंकायला खूप दिले लढे,
बरेच उभारले शब्दांचे कडे,
पण तरीही तुजवर पोहोचत नाही संदेश,
नक्की कोणता मिळाला तुला देश ?