खूण सांग

कोणत्या देशाची धरू वाट,
कोणता चढू उंच घाट,
काहीतरी दाखव मला खूण,
आधीच नको देऊ शुन्य गुण.

वर्षानुवर्षे तुला आहे शोधत,
पण संपतच नाही विरहाची मुदत,
माझ्यावर उलटलेत केलेले प्रत्येक वार,
तुझ्यानंतर बंद झालेत यशाचे दार.

माझे प्रेम किती ही असेल शुद्ध,
पण कुठेतरी कमी असल्याचही झालय सिद्ध,
तुझ्यासाठी खूप केलेत मी त्याग,
आवडेल तुला माझ्यावर लागलेला हा डाग ?

किती जगशील अशी दैवाला भिउन,
तुला काढायचा आहे हा डाग धूवून,
केवळ खूण सांग काही करू नको बाकी,
विरहाची रंगतच करून टाकेन फिकी.