गाठ

म्हणतात सारे निश्चित वेळी घडते,
मग मलाही एक प्रश्न पडते,
आपल्या पुनार्मिलनाची कधी येणार घडी,
कधी सुखावणार आपली मने वेडी.

आपली शिकवण आहे चांगली,
पण तत्पर कृती पांगली,
वाट पहातो परिणाम राहिले दूर,
चेपत जातो कधी सूर तर कधी उर.

आपण ही केले तेच,
इतरांसारखी स्वतःनेही दिली ह्रिदयाला ठेच,
वाट बघतोय दैव पलटेल,
विरह काळ हा असा उलटेल.

पण जगण्याला याने मिळते संजीवनी,
विश्वास आहे येशील सहजीवनी,
मग सात जन्मे तयार बघायला वाट,
तुझ्याशिवाय नको कुणाशी गाठ.