गुन्हा

तू तशी आणि मी असा,
आजही आहे तुझा वेडा पिसा,
हे सारे तुला आहे माहित,
तरी का आहेस विरह यातना सहित.

प्रयत्न केले, चालूच आहेत आज,
निरंतर तुझाच शोधतोय आवाज,
पण मार्ग आहेत थोडे वाकडे,
प्रयत्न सारे पडले तोकडे.

म्हणून तुझ्यासाठी तुलाच मारतोय हाक,
आपल्या प्रेमाचा पुन्हा मान राख,
एवढा आलो, एकच पाऊल तू टाक,
शुद्ध प्रेमाचा कापू नको देऊ नाक.

आपल्या एकीची प्रचंड भडकेल आग,
पुन्हा फुलेल आपली सुंदर बाग,
आपले प्रेम आता नसणार आहे गुन्हा,
नव्या आयुष्याला सुरुवात करू पुन्हा.