जादू मंतर

कोणी केला तुझ्यावर जादू मंतर,
असा कसा दिलास मला अंतर,
कोणाकडून कसलीच नव्हती अपेक्षा,
पण भलतीच घडली तुझ्याकडून उपेक्षा.

जीव लावलास माझ्यावर किती,
विसरतच चाललेलो नाती गोती,
मित्र तर दूरच राहिले,
मैत्री प्रेम सारे तुझ्यावरच वाहिले.

पण परकाच समजलीस एवढे असून,
हाल लपवून ठेवलेस माझ्या पासून,
समोर गोडच राहिलीस वाढत,
एकटीलाच त्या आगीत राहिलीस गाढत.

सुखी जीवनाची स्वप्ने असताना आखत,
शेवटी गायब झालीस डोळ्या देखत,
डोळ्यांना काहीच कळले नाही आधी,
पण घटना ही नव्हती साधी.

समजल्यावर रडलो ओरडलो,
पण तोवर विरहाने होतो भरडलो,
तन मनाचा पार झाला चुरा,
पण तुझा नाहीच पाझरला झरा.