डोळ्यात उरले ना पाणी

डोळ्यात उरले ना पाणी,
ओठ जपत आहेत तुझी वाणी,
मनी खोलवर ठेवले जतून,
आठवतोय चुका घडलेल्या हातून.

तुझे समजावणे पडायचे कानी,
पण त्यांना घेतले नाही ध्यानी,
तू गेल्यावर सार्‍याची आली जाग,
तोवर विद्रूप झालेली विरहाची आग.

आगीने काढला होरपळून,
पण हारून गेलो नाही पळून,
पुनर्भेटीचा निश्चय बांधला उरी,
तयार कापाया मोठ्ठी दरी.

म्हणूनच दुःख ठेवले बाजू,
तुझ्या कामगिरीवर नेटाने झालो रुजू,
माहित नाही यश मिळेल कधी,
पण तोवर नेटाने राहीन तुझ्या शोधी.