तन मन आता थकले

शरमेने झुकते अंग,
ना जिंकता आली जंग,
जी तुझ्या विरहाशी होती छेडली,
अन प्राण पणाला लाऊन लढली.

होती माझ्यात बरीच उर्मी,
सोबत तारुण्यातील बेशर्मी,
विरहाला आधी नव्हतेच लेखले,
ते कळल्यावर उपाय आखले.

उपायांत होते तुला शोधणे,
हाका मारत संपर्क साधने,
त्यासाठी धुंडाळली जुनी नवी वस्ती,
विराहाशी घेतली अहो – रात्र कुस्ती.

पण त्याकडे बळ होते भलते,
दैवा – चरणी सारे त्याचे चालते,
त्याच्याशी लढून तन मन आता थकले,
कधी नव्हे ते तुझ्या संमतीने आहे वाकले.