तुझा देश

कोणता आहे तो तुझा देश,
ज्याची एवढी मोठी रेष,
जिला जमले ना कराया पार,
वर्षे पेलतोय विरहाचा भार.

विरह जेंव्हा आला ध्यानी,
त्यास मिटवण्याची योजना आखली मनी,
अभ्यासल्या माझ्या देशाच्या वाटा अन सीमा,
शिवाय सारे बळ केले एकत्र जमा.

मग सुरु केले तुझ्या शोधाचे काम,
मुखी घेऊन आधी तुझेच नाम,
शोधली शहरे धुंडाळल्या सार्‍या वाटा,
ना कुणास मानले छोटा ना नाटा.

पण शोधून झाला माझा देश,
कुठेहीना सापडला तुझा नाम लेश,
एवढा तरी तुझा देश दूर किती,
विरहाची तुला नाही वाटत का भीती.