तुझा पत्ता

तुझी काहीतरी दे खबर,
विरहाने मोडली कंबर,
अकलनीय आहेत दैवाची कोडी,
संजीवनी ठरेल मदत थोडी.

सार्‍यांकडून काढली माहिती,
काही न काही लागले हाती,
धावत राहिलो त्यांच्या पाठी,
पण सारी माहिती ठरली खोटी.

आता मागणार कुणाकडे,
वाढतच आहेत अपयशाचे आकडे,
म्हणून तुझ्याकडे वळलोय आता,
तू खोटे नाही सांगणार तुझा पत्ता.