तुझी मदत

दैव मारून गेला वेळ,
सुरु केला विरहाचा खेळ,
खेळात मी कच्चा तू ही कच्ची,
तरी टिकलो कारण प्रीत होती सच्ची,

पण खेळात नव्हती समानता,
आपली होती त्यात लहानता,
विरहाची वरचढ दुर्लक्षित झाली,
तरी सार्‍यांनी त्याला दाद दिली,

पण खेळात मानली ना हार,
अधे-मध्ये मी ही करतो वार,
मला कुणाची मिळत नाही दाद,
पण अद्याप झालोही नाही बाद,

पण खेळात एकटाच उरलोय,
शिवाय पडत्या बाजूने भरलोय,
दिवसेंदिवस आहे ताकद घटते,
तुझ्या मदतीची गरज वाटते,

तू खेळ एकच डाव,
कोड्यातच कळव तुझा ठाव,
पुढचे असतील माझे वार,
बघ कसा उडतो विरहाचा बार,

पण उशीर झालाय आधीच,
वेळ दवडू नको उगीच,
चल लवकर मैदानात उतर,
विजय नक्की होईल सुकर.