तुझ्यासाठी कायपण

कधी धरला ना राग,
केवळ काढत राहिलो माग,
तशी ही नव्हती हिम्मत,
दुरावल्यावरच कळलेली तुझी किंमत.

तुझ्याशिवाय किंमत मिळाली शुन्य,
जवळ कोणतेच नव्हते पुण्य,
विरहात उत्तरोत्तर झाली सुधार,
कशाचाच उरला ना आधार.

पण प्रेमाने स्वस्त नाही दिले बसू,
दूर सारले जीवनातील सारे हसू,
तुझ्या शोधाला लागलो जोरात,
ध्येय एकच काढायची विरहाची वरात.

त्याच जोमाने आजही आहे झटत,
स्वास्थ्य नि आयुष्य दिवसेंदिवस आहे घटत,
पण ठरलय तुझ्यासाठी कायपण,
मग झिजवायला तयार सार्‍याचा कण कण.