थोडीशी कर मदत

सांग आता कोणते प्रयत्न करू,
तूच सांग कोणता मार्ग धरू,
गुरफटतच चाललाय विरहाचा फास,
मुक्तीची दिसेना कोणतीच आस.

तुझ्याशिवाय जमलं नव्हतं काही,
आज ही कुचकामी असल्याची मिळते ग्वाही,
तुला शोधण्यावर खर्चिले सारे बळ,
पण अद्याप मिळेना काही फळ.

जमले ते प्रयत्न केले सारे,
धावलो जिकडून आले माहितीचे वारे,
वारे कधी गारावले तर कधी झोंबले,
पण यश कायमच लांबले.

पुन्हा काही नाही मी मागणार,
तुझा गुलाम बनून जगणार,
नाही मी तुझ्यावर सक्ती लादत,
पण जमल्यास थोडीशी कर मदत.