दैवाचा घात

केवळ दुरावला नव्हता तुझा साथ,
दैवाने केलेला हा घात,
षडयंत्रच होते हे मोठे,
मन त्याचे होते एवढे खोटे.

प्रेम तर बरेच करतात,
एकमेकांना जीवन भर पुरतात,
त्यांना ना मिळत विरहाचा वाटा,
ना कधी निघतो असा त्यांचा काटा.

आपलाच धरला डाव,
आपल्यालाच दिला विरहाचा घाव,
शिवाय आपली आहे एवढी आवड,
कि इतरांसाठी काढत नाही सवड.

आज ही कमी ना होई त्याचा भाव दुजा,
हसत बघतोय समजून मजा,
निराधार आपण, मजा त्याला बघूदे,
आपल्या नाही त्याच्या जीवा शांती लागूदे.